समजून घ्या नैराश्य ( Depression ) म्हणजे काय व त्याची लक्षणे :- खूप वेळा जेव्हा एखाद्याचे कशातच मन लागत नसेल, उदास वाटत असेल, मन दुखी असेल तर सर्रासपणे बोलले जाते की डिप्रेस फील होतय.. खरच ह्याला depression म्हणायचे का ? की आणखीन काही वेगळे नाव देता येईल ? कशाला म्हणायचे डिप्रेशन आणि कसे ओळखावे depression ? कसे समजावे की आपलया बाजूचा एखादी व्यक्ति फक्त दुखी आहे आणि तो डिप्रेशन ने आजारी आहे. खूप वेळा डिप्रेशन चे व्यक्ति आत्महत्येस ही प्रवृत होताना दिसतात. डिप्रेशन कुणालाही होऊ शकत श्रीमंत, प्रतिष्ठित, नावलौकिक, उच्च शिक्षित, कामगार, विद्यार्थी, गृहिणी, व्यसनी अश्या कोणत्याही स्तरातील व्यक्तीला डिप्रेशन होऊ शकत. नैराश्य किंवा डिप्रेशन हा एक मानसिक विकार आहे जो एक गंभीर मानसिक आजार आहे. यामध्ये , व्यक्ती उदास राहते आणि नकारात्मक विचार त्याच्या मनात सतत येत राहतात. बर्याच वेळा एखाद्या व्यक्तीला परिस्थिती समोर असहाय्य वाटते आणि तो आयुष्य संपविण्याविषयी विचा...