Posts

Image
  बालक दिनाच्या अनेक नेक शुभेच्या ..............खरच बालकाना बालका सारखे वागवतोय का आपण ?          काय काय म्हणून उपमा द्याव्यात व दिल्यात सुद्ध आम्ही बालकांना – कोणी देवाचे दूत म्हटले,  तर कोणी देशाच भविष्य म्हटले, कोणी कोवळी पाने ,तर कोणी फुले, सूर्य, तारे, पासून तर  हातावरीची फोडे इथपर्यंत आम्ही त्यांना वर्णीत करून टाकले. वास्तवात मात्र आम्हचे त्यांच्या शी  वागणे कसे  असते ? पालक म्हणून त्यांच्याशी किती सन्मानजनक आमचा सवाद असतो?, कित्येक पालकाना तर त्यांच्याशी संवादला संवड देखील नसते. मुलाना भोवती भौतिक सुख सुविधा, ऐशो आराम देऊन मोकळे तर होतो परंतु त्यांच्या निकोप विकासावर फारसे गंभीरपणे विचार करीत नाही.  जगाच्या पाठीवर आमच्या देशाचा बालक विकास इंडेक्स मध्ये क्रमाक येतो 112 वा आणि जपान, स्पेन, जर्मनी, फ्रांस, कानाडा, नारवे ही देश पहिल्या रांगेतील.. तर शेवटची देश आहेत- माली, सेंट्रल आफ्रिका, कोंगो, नायजेरिया, सोमालीया ह्या देशान बद्दल तर बोलायलाच नको अशी अवस्था. (The best places for a child are countries like Japan, Spain, Germany,...
Image
  समजून घ्या नैराश्य ( Depression  ) म्हणजे काय  व त्याची   लक्षणे :-    खूप वेळा जेव्हा एखाद्याचे कशातच मन लागत नसेल, उदास वाटत असेल, मन दुखी  असेल तर सर्रासपणे बोलले जाते की डिप्रेस फील होतय.. खरच ह्याला depression  म्हणायचे का ? की आणखीन काही वेगळे नाव देता येईल ? कशाला म्हणायचे डिप्रेशन  आणि कसे ओळखावे depression ? कसे समजावे की आपलया बाजूचा एखादी व्यक्ति  फक्त दुखी आहे आणि तो डिप्रेशन ने आजारी आहे. खूप वेळा डिप्रेशन चे व्यक्ति  आत्महत्येस ही प्रवृत होताना दिसतात. डिप्रेशन कुणालाही होऊ शकत श्रीमंत, प्रतिष्ठित,  नावलौकिक, उच्च शिक्षित, कामगार, विद्यार्थी, गृहिणी, व्यसनी अश्या कोणत्याही  स्तरातील व्यक्तीला डिप्रेशन होऊ शकत.          नैराश्य किंवा डिप्रेशन हा एक मानसिक विकार आहे जो एक गंभीर मानसिक आजार  आहे. यामध्ये , व्यक्ती उदास राहते आणि नकारात्मक विचार त्याच्या मनात सतत येत  राहतात. बर्‍याच वेळा एखाद्या व्यक्तीला परिस्थिती समोर असहाय्य वाटते आणि तो  आयुष्य संपविण्याविषयी विचा...