समजून घ्या नैराश्य (Depression ) म्हणजे काय व त्याची लक्षणे :-
खूप वेळा जेव्हा एखाद्याचे कशातच मन लागत नसेल, उदास वाटत असेल, मन दुखी
असेल तर सर्रासपणे बोलले जाते की डिप्रेस फील होतय.. खरच ह्याला depression
म्हणायचे का ? की आणखीन काही वेगळे नाव देता येईल ? कशाला म्हणायचे डिप्रेशन
आणि कसे ओळखावे depression ? कसे समजावे की आपलया बाजूचा एखादी व्यक्ति
फक्त दुखी आहे आणि तो डिप्रेशन ने आजारी आहे. खूप वेळा डिप्रेशन चे व्यक्ति
आत्महत्येस ही प्रवृत होताना दिसतात. डिप्रेशन कुणालाही होऊ शकत श्रीमंत, प्रतिष्ठित,
नावलौकिक, उच्च शिक्षित, कामगार, विद्यार्थी, गृहिणी, व्यसनी अश्या कोणत्याही
स्तरातील व्यक्तीला डिप्रेशन
होऊ शकत.
नैराश्य किंवा डिप्रेशन हा एक मानसिक विकार आहे जो एक गंभीर मानसिक आजार
आहे. यामध्ये, व्यक्ती उदास राहते आणि नकारात्मक विचार त्याच्या मनात सतत येत
राहतात. बर्याच वेळा एखाद्या व्यक्तीला परिस्थिती समोर असहाय्य वाटते आणि तो
आयुष्य संपविण्याविषयी विचार करायला लागतो. उदासीनता झालेल्या व्यक्तीला
सामान्य आयुष्य
जगणे कठीण बनवते.
डिप्रेशनमुळे केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक नुकसान देखील होऊ शकते. याची
पुरुष, स्त्रिया आणि मुलांमध्ये वेगवेगळी लक्षणे असू शकतात, परंतु नैराश्याचा प्रत्येक
रुग्ण एखाद्या परिस्थितीत अडकला की तो एकटा वाटतो. जानेवारी महिन्यात WHO
अहवालानुसार जगभरातील सुमारे 26 कोटी लोकं हे डिप्रेशनमध्ये असल्याचं समोर आलं
आहे आणि कोरांना नंतर च्या काळात तर हा आकडा आंखिणच वाढण्याची भीती आहे.
लक्षणे कुठली ?-
एकूण 10 लक्षणे मुख्यत्वे सांगितली जातात परंतु पहिले 3 लक्षणे जर कमीत कमी 2 आठवडे सततपणे दिवसातील बहुतांश वेळ एखाद्या व्यक्तीत दिसत असतील तर आपण त्याला नैराशग्रस्त किवा depression मध्ये आहे असा तर्क लावू शकतो. ( परंतु ती व्यक्ति डिप्रेशन मध्ये आहे की नाही ही केवळ Psychiatric कच ठरवू शकतात.)
1सतत उदास/ निराश ( sadness) वाटते किवा सतत चीडचीड होणे.- हे लक्षण पूर्ण दिवसभर सतत 2 आठवडे
दिसत असेल.
2 Lost
of interest- पूर्वी करीत आलेल्या आवडीच्या कामात लक्ष ण लागणे आवड न वाटणे, कामावरती लक्ष न लागणे/ इच्छा कमी होणे, निर्णयक्षमता कमी होणे - दिवसभर सतत 2 आठवडे असेल तर.
3. Fatigue- थकवा येणे, शक्ति नसल्यासारखे वाटते. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सतत दररोज 2 आठवडे पर्यन्त
4.Low / High
appetite - भूक कमी लागते, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. काही लोकांमध्ये मात्र विरूध्द लक्षणे दिसू शकतात..
5. Disturb Sleep -झोप न लागणे किंवा शांत व पुरेशी झोप न लागणे. काहीजणाना मात्र खूप झोप लागणे असाही त्रास होऊ शकतो.
6. आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते
7. आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे.
8. दुर्घटनेनंतर काही दिवस उदास, निराश वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येकवेळी असं घडायलाच हवं असं नव्हे. काहीवेळा विनाकारणही डिप्रेशन येऊ शकतं. याला मुख्यतः मेंदूत होणारे रासायनिक बदल - मुख्यत्वे (Serotonin व Norepihephrine)कारणीभूत असतात.
9. बाळंतपणानंतर होणारे संप्रेरकातील बदल बऱ्याच स्त्रियांमध्ये कारणीभूत ठरतात. पार्किन्सन्स, हायपोथायरॉइड यासारख्या काही शारिरीक आजारांमध्येही डिप्रेशनची लक्षणं दिसू शकतात.
10. ब्लड प्रेशरची काही विशिष्ट औषधं, स्टेरॉइडस आणि काही पित्तशामक औषधांमुळेसुद्धा या आजाराची लक्षणे दिसू शकतात. लहानपणी घडलेल्या एखाद्या दुर्दैवी प्रसंगामुळेही मोठेपणी डिप्रेशन येऊ शकतं.
Depression च्या तीव्रता (Intensity ) ला कसे मोजावे –
v जर एखाद्या व्यक्तीला 10 पैकी 4 किवा 4 पेक्षा कमी आणि कधी कधी च लक्षणे जाणवत
असेल तर त्याला डिप्रेशन नाही असे संमजू शकतो.
v 4 लक्षणे आहेत आणि 2 आठवडे ते 1 महिन्यां
पासून सतत असेल तर ते MILD DEPRESSION समजावे.
v5 – 6 लक्षणे दिसत असतील तर त्याला MODERATE DEPRESSION असू शकते.
v 7 व पेक्षा जास्त लक्षणे दिसत असतील तर ते SEVER DEPRESSION असू शकते.
चेतावणी- (वरील लक्षणाच्या आधारे आपण स्वताच डिप्रेशन ठरवू नये योग्य Psychiatrist चा सल्ला घेणे गरजेचे )
डिप्रेशन टाळण्यासाठी काय करावे?
१. नियमित झोप घ्यावी.
२. सकारात्मक बोला, सकारात्मक वाचा, सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहावे.
३. दररोज किमान ३० ते ४० मिनिटे भरपूर व्यायाम करा.
४. मेडिटेशन/स्वसंमोहन करावे.
५. कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी (CBT) रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी (REBT) या उपचारांनी फायदा होतो.
६. लोकांना मदत करा, लोकांच्या संपर्कात राहावे. इतरांसाठी जे काही करता येईल ते करण्याची नेहमी तयारी ठेवावी.
७. उद्योगामध्ये गुंतलेले राहावे.
औषधांचा फायदा साधारणतः तीन ते चार आठवड्यांमध्ये दिसायला लागतो. त्याअगोदर झोप, भूक यामध्ये फायदा दिसतो. सहा ते नऊ महिने औषधे घ्यावी लागतात. नैराश्यरोग आणि उन्माद (हर्षवायू, मॅनिया) यांचे आलटून पालटून झटके येऊ शकतात. या झटक्यात डिप्रेशन येऊ शकते. अशा व्यक्तींकरिता बराच काळ औषधे घेण्याची आवश्यकता असते. नैराश्य हा आजार पूर्णपणे बरा होण्यासारखा आहे. आवश्यकता आहे पेशंटला समजून घेण्याची आणि योग्य उपचाराची.
अनिल पेटकर, समुपदेशक- ७०३८५९४२०१





धन्यवाद पेटकर सर. महत्त्वाच्या मुद्द्यांवर लिहिलं तुम्ही. माहित असलेल्या विषयात अधिक माहितीची भर पडली
ReplyDelete