बालक दिनाच्या अनेक नेक शुभेच्या ..............खरच बालकाना बालका सारखे वागवतोय का आपण ?
काय काय म्हणून उपमा द्याव्यात व दिल्यात सुद्ध आम्ही बालकांना – कोणी देवाचे दूत म्हटले, तर कोणी देशाच भविष्य म्हटले, कोणी कोवळी पाने ,तर कोणी फुले, सूर्य, तारे, पासून तर हातावरीची फोडे इथपर्यंत आम्ही त्यांना वर्णीत करून टाकले. वास्तवात मात्र आम्हचे त्यांच्या शी वागणे कसे असते ?
पालक म्हणून त्यांच्याशी किती सन्मानजनक आमचा सवाद असतो?, कित्येक पालकाना तर
त्यांच्याशी संवादला संवड देखील नसते. मुलाना भोवती भौतिक सुख सुविधा, ऐशो आराम
देऊन मोकळे तर होतो परंतु त्यांच्या निकोप विकासावर फारसे गंभीरपणे विचार करीत
नाही.
जगाच्या पाठीवर आमच्या देशाचा बालक विकास इंडेक्स मध्ये क्रमाक येतो 112 वा
आणि जपान, स्पेन, जर्मनी, फ्रांस, कानाडा, नारवे ही देश पहिल्या रांगेतील.. तर
शेवटची देश आहेत- माली, सेंट्रल आफ्रिका, कोंगो, नायजेरिया, सोमालीया ह्या देशान
बद्दल तर बोलायलाच नको अशी अवस्था.
(The best places for a
child are countries like Japan, Spain, Germany, Italy, France, Canada,
Switzerland, the UK and Norway.
The worst ten countries
for children are Eretria, Mali, Sierra Leone, Djibouti, Central African
Republic, Democratic Republic of Congo, Burkina Faso, Chad, Niger and Somalia.
The report ranks the US at 24 and China at 29. It has been given a ranking of 112
in the Child Development Index (CDI) report released by ) Ref-https://www.downtoearth.org.in/news/indias-child-development-index-ranking-drops-38733
आपल्या देशातील तरी मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या बाल हक्काचा,
त्यांच्यावरील होणाऱ्या अनेकप्रकारच्या शोषणाचा पाहिजे तेवढा ऊहापोह होताना दिसत
नाही. शाळेकडून अपेक्षा बाळगावयात तर त्याही फोल च ठरीत आहे. जेव्हा ऐकायला मिळत की
शाळेतीलच शिक्षकांनी चिमूरडीवर.........
कसे मूल्य रुजतील ?, कसे देशाचे भविष्य उजाळेल ? आणि कसे ही फुले बहरतील ? प्रश्न
प्रश्न प्रश्न आणि असंख्य प्रश्न च आहेत ?
एक शिक्षक म्हणून कितपत मुलांना समजून घेतो आपण? किती समरस होतो त्यांच्या
अडचणीशी आणि समश्ये शी ? मुलांशी वागताना, बोलताना किती विचार करतात शिक्षक
त्यांच्या भावभावनांचा?
त्यांच्यात नीतीमूल्ये रुजवणीचा किती स प्रयत्न होतो ? हे सर्वज्ञ आहे आज. मी एक शिक्षक म्हणून बरेचदा हे दृश्य पाहतोय जवळून आणि अनुभवतोय सुद्धा. काही शिक्षक स्वतातील शिकवीच्या उणीव दूर ण करता विद्यार्थ्यंनाच हाणूनपाडून बोलतात, त्यांच्याशी तुसटपणे वागतात. चूक झाली असेल तर त्यांच्या चुकीला क्षमा करणे, योग्य समुपदेशण करणे तर दूरच पान त्यांची संपूर्ण विदयार्थया समोर धिंड कशी काढता येईल ह्याचच जास्त प्रयत्न करताना दिसतात.
बालकांचा हक्क, बालकांचा शिक्षणाचा अधिकावर तर खूप दूर त्यांना वर्गात साध
मोकडे पानाने आपले मत, विचार मांडन्यायचे तरी स्वातंत्र्य आहे का विचार ? घरी शिस्त,
शाळेत शिस्त, वर्गात शिस्त ह्या शिस्तीच्या नावाने आपण त्यांचा भावनिक विकासाचा
कोंडमारा करून टाकतोय ही कळतच नाही.
कित्येक पालक तर मुलांच्या सारख्या तक्रारी करीत असतात शाळेत शिक्षकानकडे
माझ्या मुलगा / गी अशी वागते तशी वागते, आमच एकूण घेत नाही उद्धट वागतात. सारखे
टीव्ही मोबाइल ला चिटकलेले असतात. अशीच गाऱ्हाणे सुरू असते पालकांचे आजच्या
परिस्थिति मुलाना ही साधने देणे आपरिहार्यच झालेले आहे तरि सुद्धा योग्य पद्धतीने
सांजसह्याने समुपदेशण करून बालकणा चांगले वाईट ह्याची समजूत करणे आणि जाणीव करून
देणेच योग्य होय कुठल्याही punishment च्या ऐवजी. तरच आजचा बालक हा
उद्याचा सुजाण, सुज्ञ, समजूतदार नागरिक बनेल.. तोवर ह्या पोकळ बाता नुसत्याच..
तरीही बालक दिनाच्या दिवशी बालकाना बालक समजून वागणूक न देणाऱ्या बाळबुद्धीच्या
काही पालकना व काही शिक्षकाना देव सदबुद्धी देवो.. आणि बालकाना खूप खूप शुभेच्या.
अनिल पेटकर
समुपदेशक
खुप सुंदर लेख, सहज समजेल अशा शब्दात लिखित व तितक्याच प्रखरपणे सत्य मांडले
ReplyDeleteखूप छान
अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात जणू तुम्ही एका विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणेच मांडले आहे अनिल सर.
ReplyDeleteनक्कीच आपण व आपला समाज आपल्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना समजून घेतो का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
सर्वांच्या मनातील हा अंधार दूर होवो हीच प्रार्थना व आपल्या कार्यास शुभेच्छा .